बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरचे जगभरात चाहते आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही करीना ओळखली जाते. तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ती बेधडकपणे देते. करीना कपूरने एकदा काँग्रेसचे खासदार राहुल गांधींबद्दल वक्तव्य केलं होतं, तिच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधीच्या अनेक चाहत्या आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला एकेकाळी राहुल गांधी खूप आवडायचे, तिने स्वतः तिच्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. तिने राहुल गांधींबरोबर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना जाणून घ्यायला आवडेल असंही करीना म्हणाली होती.
“आपल्या समाजात जातीयवाद…”; ‘स्त्री २’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “हजारो वर्षांपासून प्रचलित…”
करीना कपूर व सिमी गरेवालची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती याबद्दल बोलताना दिसते. करीनाचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. करीनाने सैफशी लग्न करण्याआधी हे विधान केलं होतं. करीनाने सिमी गरेवालला मुलाखत दिली होती, त्यावेळी करीनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची मनसोक्त उत्तरं करीनाने दिली होती.
सिमीने करीनाला मुलाखतीत विचारलं होतं की, जर तिला एखाद्याला डेटवर घेऊन जाण्याची संधी मिळाली तर ती कोणाला निवडेल. यावर करीनाने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं. “मी हे बोलायला हवं का? कारण मला वाटतं हे मी बोलायला नको, ते कदाचित वादग्रस्त असू शकते. मला राहुल गांधी यांना डेटवर न्यायला आवडेल, कारण मला त्यांना जाणून घ्यायचं आहे,” असं करीना म्हणाली होती.
करीना पुढे म्हणाली होती की राहुल राजकीय कुटुंबातील आहे आणि ती फिल्मी कुटुंबातील आहे, त्यामुळे दोघांमध्ये चांगल्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते. तिचं बोलणे ऐकून सिमी गरेवाल चकित झाली होती.
२००९ मध्ये जेव्हा करीनाला याबाबत विचारण्यात आलं होतं, तेव्हा करीनाने ही खूप जुनी गोष्ट आहे, असं म्हटलं होतं. तिने त्यावेळी राहुल गांधींचं नाव घेण्यामागचं कारण सांगितलं होतं. दोघेही प्रसिद्ध आहोत, मला त्यांना होस्ट करायला आवडलं असतं त्यामुळे ते वक्तव्य केल्याचं करीना तेव्हा म्हणाली होती. मला एक दिवस राहुल गांधींना पंतप्रधान होताना पाहायचं आहे, पण त्यांना डेट करायचं नाही, असं करीना नंतरच्या मुलाखतीत म्हणाली होती.