मराठमोळे बॉलीवूड नाना पाटेकर आणि मूळची नेपाळची असलेली अभिनेत्री मनीषा कोईराला यांचं नातं ९० च्या दशकात खूप चर्चेत होतं. दोघेही त्या काळात चित्रपटसृष्टीत आपापल्या अभिनयाने नाव कमावत होते. पण एका चित्रपटाच्या सेटवर झालेल्या ओळखीनंतर हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले. नाना पाटेकर विवाहित होते, तर मनीषा अविवाहित होती. मात्र या नात्याभोवती वाद, गैरसमज आणि मतभेदही होते. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर नाना व मनीषा वेगळे झाले होते.

‘अग्निसाक्षी’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर व मनीषा कोयराला यांची पहिली भेट झाली होती. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या अग्निसाक्षी चित्रपटात नाना पाटेकर व मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला २० वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित नाना पाटेकर यांच्या प्रेमात पडली. त्यानंतर संजय लीला भन्सालीच्या खामोशी चित्रपटातही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात ते वडील-मुलीच्या भूमिकेत होते. परंतु, सेटवर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

मनीषा कोईरालाला नाना पाटेकरांशी लग्न करायचं होतं, असं म्हटलं जातं. नाना पाटेकर तेव्हा पत्नीपासून वेगळे राहत होते, त्यामुळे लग्न करुन आपल्याबरोबर संसार थाटावा, असं मनीषा कोईरालाला वाटत होतं. त्याचदरम्यान, नाना पाटेकरांचं नाव अभिनेत्री आएशा जुल्काबरोबरही जोडलं गेलं होतं. नाना पाटेकर व आएशाला रुममध्ये एकत्र पाहिल्यानंतर मनीषाने ब्रेकअप केलं असं म्हटलं जातं.

नाना पाटेकर विवाहित असूनही मनीषाबरोबर नात्यात होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात नेहमीच असुरक्षितता आणि दडपण राहिलं. नानांचा थोडा आक्रमक आणि रागीट स्वभाव, तर मनीषाचा भावुक आणि संवेदनशील स्वभाव यामुळे दोघांमध्ये मतभेद होत, असं म्हटलं जातं. त्यातच मनीषाने नाना व आएशा जुल्काला एकत्र पाहिल्यानंतर ब्रेकअप केलं होतं, असं म्हटलं जातं.

नाना पाटेकरांबद्दल बोलायचं झाल्यास ते पत्नी निलकांतीपासून बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. दुसरीकडे, मनीषा कोईरालाने २०१० साली नेपाळी उद्योजक सम्राट दहलशी लग्न करुन संसार थाटला होता. परंतु, अवघ्या दोनच वर्षात ते विभक्त झाले. २०१२ साली त्यांनी घटस्फोट घेतला. मनीषा आता सिंगल आहे.