Esha Deol and Bharat Takhtani: अभिनेत्री ईशा देओल काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या एक्स पतीमुळे ती चर्चेत आली आहे. उद्योगपती भरत तख्तानीने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला होता.

तो मेघना लाखानीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच भरतने मेघनाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत तुझे माझ्या कुटुंबात स्वागत आहे, असे लिहिले होते.

भरत तख्तानी व ईशा यांनी ११ वर्षांच्या संसारानंतर घेतला घटस्फोट

भरत तख्तानी व ईशा यांच्याबद्दल बोलायचे, तर त्यांनी २०१२ ला लग्नगाठ बांधली होती. ११ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२४ ला ते वेगळे झाले. यादरम्यान त्यांनी एक निवेदन दिले होते.

त्यामध्ये त्यांनी ते वेगळे होत असल्याचे स्पष्ट केले होते. परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला असून, त्यांच्या मुलींची म्हणजेच राध्या आणि मिराया यांचे संगोपन ते एकत्र करतील. तसेच त्यांचे हित हीच त्यांची प्राथमिकता असेल, असे त्यांनी म्हटले होते.

ईशा व भरत यांच्या मोठ्या मुलीचा राध्याचा जन्म ऑक्टोबर २०१७ साली झाला. २०१७ च्या सुरुवातीला त्यांनी ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी सिंधी पद्धतीने डोहाळजेवणाचा कार्यक्रम केला गेला होता. त्याच वेळी इस्कॉन मंदिरात त्यांनी पुन्हा एकदा लग्नाच्या विधी पूर्ण केल्या होत्या. त्यांनी अग्नीभोवती फेरे घेतले होते. त्या कार्यक्रमात जया बच्चन, डिंपल कपाडिया हजर होत्या. ‘रेडिट’नुसार, जया बच्चन व हेमा मालिनी तेलकुंकू विधीमध्ये या जोडप्याबरोबर होत्या.

ईशा व भरत वेगळे झाल्यानंतर धर्मेंद्र यांच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधून घेतले होते. आई-वडील वेगळे झाले, तर त्याचा मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे ईशा व भरत यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले होते.

एका जुन्या मुलाखतीत ईशाने लग्नानंतर आईने म्हणजे हेमा मालिनीने तिला काही सल्ले दिल्याचा खुलासा केला होता. नवऱ्याच्या आधी उठले पाहिजे, सासूला कामात मदत केली पाहिजे, असे सल्ले हेमा मालिनीने तिला दिले होते. दरम्यान, ईशा देओल सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.