आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण करणारा संजय दत्त ६५ वर्षांचा झाला आहे. २९ जुलैला संजय दत्तचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री सायरा बानो यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे.

सायरा बानो व संजय दत्तची आई अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) या दोघीही खास मैत्रिणी होत्या. एकदा नर्गिस दत्त मुलगा संजय दत्तला मैत्रीण सायराच्या घरी घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी संजय सायरा बानोंना असं काही म्हणाला होता की तिथे उपस्थित सर्वजण चकित झाले होते. खुद्द सायरा यांनीच याबाबत सांगितलं आहे.

प्रियांका चोप्रा-अक्षय कुमारच्या २१ वर्षे जुन्या रोमँटिक गाण्यावर मानसी नाईकच्या दिलखेचक अदा; चाहते म्हणाले…

सायरा बानो यांनी केली पोस्ट

सायरा बानो यांनी इन्स्टाग्राम स्टोरीजवर दिग्गज अभिनेते व त्यांचे दिवंगत पती दिलीप कुमार यांच्याबरोबरचा संजय दत्तचा एक जुना फोटो शेअर केला आणि हा रंजक किस्सा सांगितला. संजय दत्तने सायरा यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सायरा यांनी लिहिलं, “संजय दत्त नेहमीच माझ्यासाठी कुटुंबासारखा राहिला आहे. माझे पूर्ण कुटुंब – अम्माजींपासून ते आपाजी आणि साहेबांपर्यंत… आम्ही त्याला लहान मुलापासून ते स्टार होताना पाहिलं आहे. मला अजूनही आठवतंय जेव्हा नर्गिस आपा आमच्या घरी कार्यक्रमांना यायच्या. त्यावेळी संजय त्यांच्याबरोबर यायचा आणि खूप गोड दिसायचा.”

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

Saira Banu post for sanjay dutt
सायरा बानो यांची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

When Young Sanjay Dutt Wanted to Mary Saira Banu: त्यांनी पुढे लिहिलं, “नर्गिस जी मग त्याला म्हणायच्या, ‘तू जे नेहमी मला सायराजींबद्दल म्हणतोस ना ते त्यांना म्हण,’ मग संजू प्रेमाने माझ्याकडे बघून गोड आवाजात म्हणायचा, ‘मी शैला बानोशी लग्न करणार.’ हाहाहा, किती गोड! मला वाटतं मी व शर्मिला टागोर संजूला खूप आवडायचो. आम्ही सर्वजण त्याच्या प्रवासाचा एक भाग राहिलो आहोत. त्याचे माझ्या मनात खास स्थान आहे.”

हातात हिरवा चुडा, पिवळी साडी अन्…; मानसी नाईक Photos शेअर करत म्हणाली, “मला झालेला त्रास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय दत्तने शेअर केले ‘केडी – द डेव्हिल’मधील लुक पोस्टर

संजय दत्तने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. त्याने ‘केडी – द डेव्हिल’ या चित्रपटातील त्याचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता एकदम राऊडी लूकमध्ये दिसत आहे. त्याने डेनिम जॅकेटसह काळी लुंगी नेसली आहे, डोक्यावर पोलिसांची टोपी, गळ्यात बेल्ट आणि हातात काठी धरलेली आहे. तसेच संजयने लांब केस व मिशा त्याच्या भारदस्त लूकमध्ये भर घालत आहेत. त्याच्या या लुकची खूपच चर्चा होत आहे.