डिनो मोरिया, बिपाशा बासूची मुख्य भूमिका असलेला ‘राज’ चित्रपट तुम्हाला आठवत असेल. या भयपटातील रोमँटिक गाणी खूप गाजली होती. डिनो आणि बिपाशा यांच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती. या सिनेमात या दोघांव्यतिरिक्त आणखी एक अभिनेत्री होती, जिचा ‘मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी’ हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला होता. ती अभिनेत्री कोण आहे व आता कुठे आहे, याबाबत जाणून घेऊयात.

‘राज’मध्ये डिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांच्याशिवाय अभिनेत्री मालिनी शर्मा होती. तिने भुताची भूमिका केली होती. या चित्रपटात तिची दमदार भूमिका होती. सिनेमात डिनो व मालिनीचं अफेअर दाखवण्यात आलं होतं. दोघांमध्ये खूप इंटिमेट आणि रोमँटिक सीन शूट करण्यात आले होते. विवाहित डिनो मालिनीशी लग्न करण्यास नकार देतो आणि ती गोळी मारून आत्महत्या करते. मग ती भुताच्या रुपात त्याला व बिपाशाला त्रास देते अशी चित्रपटाची कथा होती. या चित्रपटानंतर तिच्या अभिनयाची व सौंदर्याचीही खूप चर्चा झाली.

आमदार धिरज देशमुखांसाठी अभिनेत्री रकुल प्रित सिंहने केली खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

मॉडेलिंगपासून केली करिअरची सुरुवात

मालिनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने करिअरमध्ये अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती बॉम्बे वायकिंगच्या ‘क्या सूरत है’ या गाण्यातही दिसली होती. इतकंच नाही तर अभिनेत्रीने मिका सिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्यात काम केलं होतं.

सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठे आहे मालिनी शर्मा?

मालिनी शर्माच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झाल्यास तिने प्रियांशू चॅटर्जीशी लग्न केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. चार वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता मालिनी शर्मा कुठे आणि काय करते याबद्दल माहिती उपलब्ध नाही.