अजय देवगण व काजोल यांची लेक निसा कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. बऱ्याचदा निसाचे तिच्या मित्रांबरोबर पार्टी करतानाचे फोटो खूप व्हायरल होतात. असेच फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले व त्यानंतर वेदांत महाजन हे नाव चर्चेत आलं. वेदांत महाजन हा निसा देवगणचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा आहेत. अद्याप या दोघांनीही याबद्दल भाष्य केलेलं नाही. निसाचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन कोण आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – आकाश व श्लोका अंबानीच्या लेकीचं नाव ठरलं; पृथ्वीने केली लाडक्या बहिणीच्या नावाची घोषणा

‘डीएनए’च्या वृत्तानुसार, २५ वर्षीय उद्योजक वेदांत महाजन त्याचे मित्र माणक धिंग्रा आणि मोहित रावल यांच्यासह एमव्हीएम एंटरटेन्मेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-मालक आहे. ते तिघे मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये भव्य क्लब पार्टीचे आयोजन करतात, ज्यात जान्हवी कपूर, अहान शेट्टी, माहिका रामपाल, आर्यन खान आणि निसा देवगण यांच्यासह अनेक स्टार किड्स सहभागी होतात.

हेही वाचा –‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी पृथ्वीक प्रतापला किती मानधन मिळतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

वेदांत आणि त्याच्या दोन मित्रांनी २०१४ ते २०१६ अशी सलग तीन वर्षे त्यांच्या शाळेतील मित्रांसाठी त्यांच्या टेरेसवर नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन केले होते. कारण त्यांना क्लबमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यांच्या पार्टीला ५०० हून अधिक लोक उपस्थित होते. त्यानंतर पार्टी आयोजित करण्यासाठी मुंबईच्या नाइटक्लब आणि हॉटेल्सने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हापासून ते बिग बजेट पार्टींचे आयोजन करत आहेत. वेदांतने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर फोटो शेअर केले आहेत. त्याचे निसाबरोबरचे अनेक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. अलीकडच्याच एका पार्टीतील फोटोंनंतर निसा व वेदांत एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ मध्ये वेदांत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये उद्योजकतेमध्ये मास्टर्स करण्यासाठी गेला आणि त्याने तिथे दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली. पण करोनामध्ये सगळं थांबलं, त्यानंतर त्याने लंडनमध्ये नाइटक्लबसाठी पार्टी आयोजित करण्यास सुरुवात केली. रणवीर सिंग, कनिका कपूर, इम्रान खान, डिव्हाईन, तेशर, रित्विज, गॅरी संधू आणि रॅमोन रोचेस्टर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्याने आयोजित कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vedant Mahajan (@vedantmahajan10)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदांत महाजनने त्याच्या कामाचं स्वरुप व काम करताना येणारा दबाव याबद्दल ‘जीक्यू इंडिया’शी बोलताना माहिती दिली होती. “तीन तासांचा कार्यक्रम तुम्ही इंटरनेटवर पाहता, तो खूप ग्लॅमरस असतो. पण खूप कमी लोकांना आमच्या कामाची आणि तणावाची कल्पना असते. त्या तीन तासांसाठी आम्हाला कधी कधी एक आठवडा, तर काही वेळा एक महिना तयारी करावी लागते. इतकं असूनही तो कार्यक्रम नीट पार पडेल की नाही याबद्दल टेन्शन असतं. लाइटपासून ते संगीतापर्यंत सर्व काही ठरवून त्याची अंमलबजावणी करणे, तिथले कर्मचारी आणि येणारे लोक यांचे आरोग्य व सुरक्षा ही माझी जबाबदारी असते, त्यामुळे कामाचा खूप दबाव असतो,” असं वेदांत म्हणाला होता.