scorecardresearch

अमिताभ बच्चन फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागचं कारण नेमकं काय?

मागच्या बऱ्याच वर्षांपासून अमिताभ बच्चन फ्रेंचकट दाढी ठेवत आहेत.

अमिताभ बच्चन फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागचं कारण नेमकं काय?
अमिताभ बच्चन कायम अशी फ्रेंच कट दाढी का ठेवतात याचा खुलासा आता झाला आहे.

बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. आज ७९ वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांचा उत्साह नेहमीच पाहण्यासारखा असतो. पण अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं तर एक बाब प्रत्येक ठिकाणी समान असते आणि ती म्हणजे त्यांची फ्रेंच कट दाढी. ज्याची अनेकांनी कॉपी केली आहे. पण अमिताभ बच्चन कायम अशी फ्रेंच कट दाढी का ठेवतात याचा खुलासा आता झाला आहे.

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबरला ८० वा वाढदिवस आहे. रुपेरी पडद्यावर ज्यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. बिग बी फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागे एक खूपच रंजक किस्सा आहे. विशेष म्हणजे हा किस्सा त्यांच्या कामाशीच संबंधीत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना अशाप्रकारे फ्रेंच कट दाढी ठेवण्याचा सल्ला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला होता. एका चित्रपटासाठी असलेला हा लुक त्यांनी त्यानंतरही कायम ठेवला.

आणखी वाचा- “माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक हीट चित्रपट देणारे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी अलिकडेच त्यांचं पहिलं पुस्तक ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ प्रकाशित केलं. ज्यात प्रसिद्ध दिग्दर्शकाने कलाकारांसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ज्यात एक किस्सा अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधीत आहे. जो बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बिग बींचे ११ अजरामर चित्रपट पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पुस्तकात ‘अक्स’ चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सांगितला आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, “मी बच्चनजींना नेहमी क्लिन शेवमध्ये पाहिलं होतं. पण मला वाटलं या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी त्यांना फ्रेंच कट दाढी चांगली दिसेल. यावर ४-५ महिने चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा ट्रायल झाली तेव्हा अमिताभ बच्चन यांना तो लूक आवडला. त्यांनी या लुकसाठी होकार दिला.” दरम्यान ‘अक्स’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांचा दाढीचा लूक आजपर्यंत बदलला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या