सुकेश चंद्रशेखर हा २० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहे. जेव्हा २०१८मध्ये सुकेशला दिल्लीच्या तिहार तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा तो खूप आलिशान जीवन जगत होता. तुरुंगात आलिशान सुसज्ज खोली, डायसन फॅन, प्लेस्टेशन, एअर कंडिशनर, फ्रीज, मिठाईच्या बॉक्समध्ये रोख रक्कम, अॅपलची उत्पादनं, रोलेक्स घड्याळं आणि डिझायनर बॅगा त्याठिकाणी होत्या, अशी माहिती सुकेशची कथित साथीदार पिंकी इराणी आणि २०१८ मध्ये तिहार तुरुंगातील १ नंबर जेलमध्ये त्याला भेटलेल्या तीन महिलांनी दिली होती. २०० कोटींच्या घोटाळ्यात सुकेशवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून चार महिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांतसिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलेले फक्त २१ रुपये, वाचा संपूर्ण किस्सा

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुकेश दिल्ली, मुंबई, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये ३२ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये गुंतलेला आहे. २०२० आणि २०२१ च्या सुरुवातीच्या काळात तो दिल्लीच्या रोहिणी तुरुंगात असताना त्याने तुरुंगात बंद असलेल्या उद्योगपती शिविंदर मोहन यांच्या पत्नी अदिती सिंगची फसवणूक केली होती. आपण केंद्रीय कायदा सचिव असल्याचं सांगत तुरुंगात असलेल्या पतीला जामीन देण्याची ऑफर देऊन त्याने तिला २०० कोटी रुपयांचा गंडा घातला होता. या फसवणूक प्रकरणात पिंकी इराणीवरही आरोप करण्यात आले होते. तर, निकिता तांबोळी, चाहत खन्ना आणि सोफिया सिंग या प्रकरणांमध्ये पोलीस साक्षीदार आहेत. या तिघींनी २०१८मध्ये तुरुंगात सुकेशची भेट घेतली होती.

“माझी गर्लफ्रेंड हो! तुला राजेशाही थाटात ठेवतो”, नोरा फतेहीनं सांगितली घोटाळेबाज सुकेशची ऑफर

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपपत्रं दाखल केली आहेत आणि १७ जणांवर आरोप करण्यात आले आहेत. यात पाच तुरुंग अधिकाऱ्यांनी सुकेशला तुरुंगातील नियमांचे उल्लंघन करण्यात मदत केली होती, त्यांच्या नावांचाही समावेश आहे. ताज्या आरोपपत्रातील आरोपांनुसार सुकेशने पिंकी इराणीला अभिनेत्री आणि मॉडेल्सशी ओळख करून देण्यासाठी पैसे दिले होते. निकिता तांबोळी, चाहत खन्ना यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २०१८ मध्ये त्या जेव्हा सुकेशला भेटल्या तेव्हा तुरुंगात जाताना त्यांची कोणतीही चौकशी करण्यात आली नव्हती. आमचे ओळखपत्रही मागितले नव्हते. आम्ही पिंकी इराणीबरोबर सुकेश असलेल्या रुममध्ये गेलो होतो. त्याच्या रुममध्ये पैसे, महागड्या बॅग्स, मोठा टीव्ही, सोफा, डायसन फॅन, फ्रीज आणि फूड बार, लॅपटॉप्स, अॅपलचे ब्लूटूथ स्पीकर्स, फोन, रोलेक्सच्या घड्या, प्ले-स्टेशन, रोख रक्कम आणि महागड्या ब्रँडेड बॅग्स पडून होत्या. त्यापैकी काही गिफ्ट त्याने आपल्याला दिल्याचं चाहत व निकिताने सांगितलं होतं.

“भारतीय चित्रपटांचा आदर करा” जावेद अख्तर यांचं वक्तव्य, हॉलिवूडशी तुलना करत म्हणाले, “जगभरातील…”

या सर्व आरोपांबद्दल विचारलं असता सुकेशचे वकील अनंत मलिक म्हणाले, “सुकेशची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि त्याला चुकीचं दाखवण्यासाठी तपास यंत्रणा हे आरोप करत आहेत. मॉडेल्स सुकेशला २०१८-२०१९मध्ये भेटल्या होत्या. तर, २०० कोटींचं प्रकरण हे २०२०-२१मधील आहे. सुकेशला तुरुंगात भेट देणार्‍या मॉडेल्सचा सध्याच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. सुकेश तुरुंगात ऐशोआरामात राहतोय, त्याचं उत्तर तुरुंग प्रशासनाने द्यायला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women describes sukesh chandrashekhar fancy life in tihar jail hrc
First published on: 21-01-2023 at 12:21 IST