बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा. चित्रपट रील्समधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. दोघांनी तीन वर्षांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे पूर्णपणे वेगन होण्याचा, दोघे पूर्णतः आता वेगन आहेत. दोघांचं असं म्हणणं आहे की यामुळे त्यांच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणले आहेत.

आज जागतिक वेगन दिनानिमित्त जिनिलियाने आपल्या मुलाची एक आठवण सांगितली ती असं म्हणाली “माझा मोठा मुलगा रियानच्या डोक्यात शाकाहारी असण्याची कल्पना आली होती तो शाळेतून आला आणि म्हणाला आई आपला कुत्रा आणि तू दोघे चिकन खाता मग दोघात फरक काय? त्याच्या या बोलण्याचा मी विचार केला.”

Photos : भूमिकेसाठी काहीपण! ‘या’ अभिनेत्रींनी ब्रेकअपनंतरही केलं एक्स बॉयफ्रेंडबरोबर काम

या जोडप्याला आता वेगनबद्दल जागरूकता पसरवायची आहे, कारण त्यांची मुले रियान आणि राहिल देशमुख आय पूर्णपणे वेगन झाली आहेत. रितेश म्हणाला “आम्ही वेगन झाल्यानंतरचे अनुभव शेअर करत आहोत. आम्ही आमचे रक्त जेव्हा तपासले तेव्हा मला डॉक्टर आम्हाला म्हणाले तुम्ही तरुण वाटत आहात. प्राण्यांसाठी उचलेलले हे एक पाऊल आहे असं म्हणता येईल’.”

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी हे जोडपं कर्ली टेल्सच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा रितेशने असं सांगितले होते की जिनिलियाला खाकरा पदार्थ खूप आवडतो. तसेच अस्सल मराठमोळा मिरचीचा ठेचादेखील तिला आवडतो. ‘तुझे मेरी कसम’ या हिंदी चित्रपटात ते पहिल्यन्दा एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनी मस्ती, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात काम केले होते.