या फोटोत दिसणारी अभिनेत्री ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. या गोंडस अभिनेत्रीने आतापर्यंत आयुष्मान खुराना, हृतिक रोशन, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन अशा अनेक मोठ्या स्टार्सबरोबर चित्रपट केले आहेत. फोटोत पांढरा फ्रॉक घातलेल्या या गोंडस मुलीला तुम्ही ओळखू शकला आहात का? तुम्हाला ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला तिचं नाव सांगणार आहोत.

“मी स्वार्थी होतो”, डिंपल कपाडिया वेगळ्या राहू लागल्यावर राजेश खन्नांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “ती दिवस-रात्र…”

हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर इथे जन्मलेली ही अभिनेत्री लहानपणाासूनच ती अभ्यासात हुशार होती. एका सामान्य मुलीसारखी ती मोठी होत होती. मोठं होऊन IAS अभिनेत्री व्हायचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. तिला कधीही अभिनेत्री व्हावं, असं वाटलं नव्हतं. पण नियतीला वेगळंच मंजूर होतं, तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न मागे पडलं आणि ती बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री झाली.

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री यामी गौतम आहे. ती सध्या ‘ओएमजी २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी यामीने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. या फोटोला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले होते. यामीचे लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न होते, परंतु आयुष्याने असा यू-टर्न घेतला की ही सुंदर मुलगी बॉलीवूडची क्वीन बनली.

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकिलीचं शिक्षण घेताना अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे तिने अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला. अभ्यास सोडल्यानंतर आईनं तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर यामीनं मॉडेलिंग सुरू केलं. अशातच तिला ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात मिळाली आणि ती लोकप्रिय झाली. पुढे तिने काही मालिका केल्या. नंतर ‘विक्की डोनर’ या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ सारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला.