हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान काही वर्षांपासून अभिनेता अर्सलान गोनीला डेट करत आहे. सुझान व हृतिकचा १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सुझानला आयुष्यात अर्सलानच्या रुपात जोडीदार सापडला. आता दोघेही रिलेशनशिपमध्ये असून एकत्र आनंदी आहेत. सुझानची आई जरीन खान यांनी पहिल्यांदाच एका मुलाखतीत तिच्या मुलीच्या लव्ह लाईफबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सुझानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिकबरोबरच्या बाँडिंगबद्दलही खुलासा केला आहे.

जरीन यांनी ‘टाईम्स एंटरटेनमेंट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की हृतिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुझानला अर्सलानमध्ये तिचा जोडीदार सापडला याचा त्यांना आनंद आहे. सुझान आणि अर्सलान लग्न करणार का? असं विचारण्यात आल्यावर आता आयुष्यात स्थिरावण्यासाठी लग्न हा महत्त्वाचा घटक नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीबद्दल जरीन खान म्हणाल्या…

“अर्सलान गोनीने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि तो जम्मूमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहे. त्याला अभिनयाची आवड आहे, त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देते. त्याचे कुटुंबीय खूप चांगले आहेत, सुझान आणि अर्सलान एकत्र खूश आहेत, हे पाहून मला आनंद होतोय,” असं जरीन खान म्हणाल्या.

“वयानुसार आनंदी राहण्यासाठी अन्…”; घटस्फोटित सुझान खानच्या अफेअरबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया

हृतिक रोशनबद्दल काय म्हणाल्या जरीन खान?

जरीन खान यांनी सुझानचा पहिला पती हृतिक रोशनचं कौतुक केलं. अभिनेत्याबद्दल जरीन म्हणाल्या, “मी त्याला माझा मुलगा मानते आणि नेहमीच तो माझा मुलगा राहील. तो आणि माझी मुलगी आता एकत्र नसले तरीही ते एकमेकांना चांगले मित्र मानतात. दोघेही आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे संगोपन करत आहेत.”

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० वर्षांपूर्वी वेगळे झाले हृतिक रोशन व सुझान खान

हृतिक व सुझान खान यांनी २००० मध्ये लग्न केलं होतं. १४ वर्षे त्यांनी संसार केला आणि नंतर दोघांनी २०१४ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. ऱ्हेहान व हृदान रोशन अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. घटस्फोटानंतर सुझानला दोन्ही मुलांचा ताबा मिळाला. ती आणि हृतिक त्यांच्या मुलांचे सहपालक आहेत. दोघेही बऱ्याचदा आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीवर जातात. घटस्फोटानंतर काही वर्षांनी सुझानने अर्सलान गोनीला डेट करायला सुरुवात केली. तर, हृतिकने अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे.