ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच मराठीमध्ये ‘टाईमपास ३’ सारखे बहुचर्चित चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तो चित्रपट म्हणजे ‘बॉईज ३’ (Boyz 3). या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. चित्रपटाच्या दोन्ही भागांना बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा मराठीमधील हे बॉईज दंगा करायला तयार झाले आहेत. या चित्रपटाच्या नव्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – “बालपणापासूनच मी संघ स्वयंसेवक” ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकांनी मोहन भागवतांबाबत शेअर केलेली पोस्ट चर्चेत

या मोशन पोस्टरमध्ये बोल्ड लूकमधील एका मुलीचा अर्धाच चेहरा दिसत आहे. तर तिच्या पाठी चित्रपटामधील तीन मुख्य कलाकार तिच्याकडे पाहताना दिसताहेत. चित्रपटाचं हे मोशन पोस्टर पाहून ‘ती’ नक्की कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अजुनही पोस्टरमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नाव गुलदस्त्यातच आहे. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाने ‘बॉईज’च्या आधीच्या भागांमध्ये धमाल-मस्ती केली.

पाहा व्हिडीओ

यापूर्वी ‘बॉईज’ व ‘बॉईज २’मध्ये धैऱ्या, ढुंग्या व कबीरच्या आयुष्यात मुली आल्या. मात्र प्रत्येक वेळी कबीरचंच नशिब फळफळलं. आता यावेळी ‘ती’ मुलगी नक्की कोणाच्या आयुष्यात येणार हे पाहणं गंमतीशीर असणार आहे. ‘ती’च्या येण्याने या तिघांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार? हे ‘बॉईज ३’मध्ये पाहायला मिळेल.

आणखी वाचा – “पैसे खाल्ले की नाही…” संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर आरोह वेलणकरचं ट्वीट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधूत गुप्ते प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. या चित्रपटातही पुन्हा प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हेच त्रिकुट झळकणार आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘बॉईज ३’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.