Brahmastra Box Office Collection Day 2: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने आणखी जबरदस्त कलेक्शन केले. ग्रॉस वर्ल्ड वाइड कलेक्शन, ७५ कोटी आणि दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन बघितले तर चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘ब्रह्मास्त्र’कडून इतक्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा कोणालाच नव्हती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे.

अयान मुखर्जीच्या साय-फाय ड्रामा चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास ३६ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने दुसऱ्या दिवशी ४१.२५ ते ४३.१५ कोटी कमावले आहेत. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सुमारे २० टक्‍क्‍यांची उसळी घेतली आहे आणि हे दीर्घ काळानंतर बॉलिवूडसाठी हा सकारात्मक संकेत आहे.
आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दीपिका पदुकोण साकारतेय रणबीरच्या आईची भूमिका? फोटो व्हायरल

शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने ३७.५०कोटींचा व्यवसाय केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास ६९.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या आठवड्याअखेर हा चित्रपट ११० कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास आहे. नॉन हॉलिडेला प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी हा खूप मोठा आकडा आहे. तेलुगू व्हर्जनने पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली असली तरी दुसऱ्या दिवशी त्याची कमाई ३ कोटींवर आली आहे. पण तमिळ व्हर्जनमध्ये ५० लाखांची जास्त कमाई झाली आहे.

आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’मुळे PVR ला ८०० कोटींचं नुकसान? विवेक अग्निहोत्री म्हणाले “चुकीच्या गोष्टी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्रह्मास्त्र’ सुरुवातीपासूनच ट्रोल गँगच्या निशाण्यावर होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून #BoycottBrahmastra ट्विटरवर सतत ट्रेंड करत आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या ट्रेंडचा काही परिणाम झालेला दिसत नाही. ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरला. मात्र, लाखो प्रयत्नांनंतरही तो ‘केजीएफ चॅप्टर २’ चा ५६ कोटींचा आकडा गाठू शकला नाही.