निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघने सुरू केलेल्या कास्टिंग काऊचच्या वेब एपिसोडला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राधिका आपटेपासून सुरू केलेल्या या वेब मालिकेचा नुकताच तिसरा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला. यंदाच्या एपिसोडमध्ये दिल दोस्ती दुनियादारीतील रेश्मा, अॅना आणि मिनल म्हणजेच सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या तिघी आल्या होत्या. पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे त्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर आणि आता तिसऱ्या कार्यक्रमात या तिघिंनी हजेरी लावली.
यंदाच्या एपिसोडमध्ये अमेयच्या प्रश्नावर स्वानंदी आणि सखीची सडेतोड उत्तरं पाहावयास मिळतात. त्यामुळे नक्की कोणाचा कास्टिंग काउच होतो ते पाहण्यासाठी तुम्ही हा मजेशीर भाग पाहाचं.
मराठी सिनेअभिनेत्रींना घेऊन भारतीय डिजिटल पार्टीने ही वेब सिरीज सुरू केली आहे. यामध्ये सर्वात पहिली राधिका आपटे आली होती. या वेब सिरिजमध्ये सध्याचे ट्रेंडिंग विषय आणि त्यावेळी चर्चेत असलेल्या व्यक्तीला गेस्ट म्हणून बोलावले जाते. अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी या दोघांनी मिळून या मालिकेचे सूत्रसंचालन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: सखी, स्वानंदी आणि पूजासह ‘कास्टिंग काउच’
हवंतर मी माल पुरवते पण बाबांचा याच्याशी काही संबंध नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 21-05-2016 at 13:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casting couch with amey and nipun third episode with sakhi gokhale pooja thombare and swanandi tikekar