“आधी ताई म्हणाला आणि नंतर…”, ४८ वर्षांच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Charmila Shocking Casting Couch Producer
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलीवूडपासून टॉलीवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्री चारमिलाने कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ४८ वर्षीय चारमिलाने सांगितले की, ज्या निर्मात्यांसोबत ती चित्रपट करत होती, आधी तो तिला मोठी बहिण बोलायचा नंतर ५० हजार रुपयांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली होती.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

चारमिलाने Indiaglitz ला दिलेल्या मुलाखतीत तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. चारमिलाने सांगितले की तिने अलीकडेच एका चित्रपटाचे शूटिंग केले, ज्यामध्ये ती आईची भूमिका साकारत होती. चारमिलाने सांगितले की हा एक मल्याळम चित्रपट होता, ज्याचे शूटिंग कालिकतमध्ये झाले होते. या चित्रपटाचे निर्माते खूपच तरुण होते. तो सुमारे २४ वर्षांचा होता. चारमिलाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तो तिला ताई म्हणत असे, परंतु तीन दिवसांनंतर त्या निर्मात्यांनी तिच्या असिस्टंटकडे जाऊन ५० हजार रुपयांच्या बदल्यात सेक्सची मागणी केली.

आणखी वाचा : “ऋषीजी गेल्यानंतर तुम्ही खूप फिरत आहात”; नीतू कपूर यांच्या ‘या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

निर्मात्यांनी चारमिलाला पैशाच्या बदल्यात आपल्यासोबत सेक्ससाठी त्यापैकी एकाची निवड करण्याची मागणी केली. हे कळताच चारमिलाला आश्चर्य झाले आणि तिला कळलेच नाही की नक्की काय झाले. त्यानंतर त्या निर्मात्याला म्हणाल्या की, “तू माझ्या मुलापेक्षा थोडाच मोठा आहेस. तर त्याने चारमिलाला आईच्या जागी मानावे, पण त्या निर्मात्यांनी चारमिलाचे ऐकले नाही. यानंतर चारमिला तिथून निघून गेली आणि विमानाने चेन्नईला परत आली.

आणखी वाचा : धनंजय मानेच्या नावाने मीम्सचं पेज चालवणाऱ्याची अशोक सराफांनी घेतली शाळा, फोटो शेअर करत; म्हणाला…

चारमिला सिंगल मदर असून तिला एक मुलगा आहे. चारमिलाने १९९५ मध्ये अभिनेता किशोर सत्यासोबत लग्न केले, पण ४ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. २००६ मध्ये चारमिलाने एका इंजिनियरशी दुसरे लग्न केले, पण २०१४ मध्ये ते लग्नही तुटले. या लग्नापासून चारमिलाला मुलगा झाला.

आणखी वाचा : इंटिमेट सीनसाठी रणवीरची परवानगी घेते का? दीपिका, म्हणाली…

तिच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, चारमिलाने १९७९ मध्ये नल्लाथोरु कुडुंबम या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तमिळ आणि तेलुगू व्यतिरिक्त त्यांनी मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. कास्टिंग काउचबद्दल बोलायचे झाले तर चार्मिलाच्या आधी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनीही याबाबत खुलासे केले होते. अनुष्का शेट्टीपासून ते रकुलप्रीत सिंग, अदा शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Charmila shocking casting couch producer offers 50 thousand rs for sexual favours used to call her elder sister dcp

Next Story
“मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे असण्याला ‘परंपरा’ मानलं पाहीजे…” दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं ट्वीट चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी