समांथा आणि नागाचैतन्यने सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली. पण अभिनेता सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे समांथावर निशाणा साधला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.
नागाचैतन्यशी लग्न करण्यापूर्वी समांथा अभिनेता सिद्धार्थला डेट करत होती. करिअरच्या सुरुवातीला त्या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे एकमेकांवर आरोप करताना दिसले होते. आता समांथा आणि नागाचैतन्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे समांथावर निशाणा साधला असल्याचे दिसत आहे. सिद्धार्थने केलेल ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी वाचा : ‘घटस्फोट तर स्वर्गातच…’, समांथा-नागाचैतन्यच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्माचे ट्वीट चर्चेत
‘शाळेतील शिक्षकांकडून शिकलेल्या पहिल्या धड्यांपैकी एक… चिटिंग करणाऱ्यांचे कधीही भले होत नाही… तुम्ही कोणता धडा शिकलात?’ या आशयाचे ट्वीट सिद्धार्थने केले होते. या ट्वीटच्या माध्यमातून सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे समांथावर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वी एका मुलाखतीमध्ये समांथाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी वक्तव्य केले होते. ‘अभिनेत्री सावित्रीप्रमाणेच माझे वैयक्तिक आयुष्यात संकटात होते. पण नशीबाने मला लवकर जाणीव झाली आणि मी त्या नात्यातून बाहेर पडले. मग माझ्या आयुष्यात नागाचैतन्य सारख्या व्यक्तीची एण्ट्री झाली’ असे समांथा म्हणाली होती. आता समांथा आणि नागाचैतन्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर सिद्धार्थने ट्वीट करत अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.