scorecardresearch

Premium

Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर

ऋतुराज गायकवाड हा त्याच्या लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळणार नाही.

ruturaj gaikwad
ऋतुराज गायकवाड

आयपीएलच्या १६ व्या हंगामातील महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगमाचे चॅम्पियन होण्यासाठी या दोन्ही संघामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातच आता ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

चेन्नईकडून खेळणारा टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नसल्याचे बोललं जात आहे. येत्या ३ ते ४ जूनदरम्यान ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा : “माझी एवढीच इच्छा…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले थेट वक्तव्य

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड हा त्याच्या लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळणार नाही. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या फायनलनंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकावं लागणार आहे. ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वालची टीम इंडियामध्ये वर्णी लागली आहे.

“ऋतुराज गायकवाडने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं होतं. लग्नामुळे मला लंडनला लवकर निघता येणार नाही. पण मी ५ जूननंतर टीमबरोबर सहभागी होईन, असं ऋतुराजने सांगितले होते. त्यामुळे कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली होती. यानुसार ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वालचा समावेश टीममध्ये केला जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.

आणखी वाचा : “आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ७ ते ११ जून दरम्यान करण्यात आलं आहे. तर १२ जून हा राखीव दिवस आहे. या अंतिम सामन्सासाठी ऋतुराजची टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer ruturaj gaikwad marriage set to get married in the first week of june to miss wtc final nrp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×