प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) असे या चित्रपटाचे नाव आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ हा चित्रपट काल २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला चिन्मय ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रेमा विषयी सगळ्या चाहत्यांचे आभार मानतो आणि बोलतो, “फक्त तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. कृपया चित्रपट पाहत असताना, चित्रपटाचा शेवट आपल्या मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर शेअर करू नका. कारण आपले इतर मित्र जे हा चित्रपट पाहणार आहेत. त्यांना तो थरार जसा तुम्ही चित्रपटगृहात अनुभवलात तसाच अनुभवू द्या.” हा व्हिडीओ शेअर करत “मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन” असे कॅप्शन चिन्मयने दिले आहे.

आणखी वाचा : करिअरच्या सुरुवातीला स्टुडिओमध्ये उलटी साफ करण्याचंही काम केलंय; रवीना टंडनचा खुलासा

आणखी वाचा : मनोज वाजपेयीची दुसरी पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री? जाणून घ्या त्याच्या पत्नी विषयी

दरम्यान ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली आहे.

‘येळकोट देवाचा’ आणि शिवबा राजं ही दोन्हीही गाणी सध्या युट्यूबर ट्रेंडीग पाहायला मिळत आहे. ही दोन्हीही गाणी दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinmay mandlekar shared video on social media after released of sher shivraj and he has a request for audience dcp
First published on: 23-04-2022 at 12:52 IST