मराठी चित्रपट व्यवसायाच्या अभिवृध्दीसाठी जे मराठी चित्रपट व्यावसायिक आपआपल्यापरिने आयुष्यभर कार्यरत राहिले, त्यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रभूषण हा श्रेष्ठ पुरस्कार देऊन विशेष गौरव केला जातो. महामंडळाचे मानपत्र, विशेष मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, लता मंगेशकर, दिनकर द.पाटील, वसंत पेंटर, नटवर्य वसंत शिंदे, चंद्रकांत मांडरे, शरद तळवलकर, लीलाबाई पेंढारकर, आण्णासाहेब देऊळगावकर, राजदत्त, सुलोचनाबाई, गणपत पाटील, रमेश व सीमा देव, जयश्री गडकर, सचिन पिळगावकर यांन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदाचे चित्रभूषण पुरस्काराचे मानकरी
१. पत्रकार/लेखक- इसाक मुजावर
२. अभिनेत्री- रेखा कामत
ज्यांनी आयुष्यभर, या ना त्याप्रकारे मराठी चित्रपटांसाठी काम केले, आपली सेवा रुजू केली. अशा ज्येष्ठ मराठी चित्रपट व्यावसायिकांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल विनम्र कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना चित्रकर्मी हा मानाच पुरस्कार दरवर्षी विशेष समारंभात देण्यात येतो. विजू खोटे, उत्तरा केळकर, सरला येवलेकर, जयमाला काळे, रामा कांबळे, जयसिंग कांबळे, आप्पा मुल्ला, शरद चव्हाण, विलास मोरबाळे, मधू पाटील, आण्णा देशपांडे, केशव पंदारे, मोहन वैद्य, स्वरुपकुमार, मधू गायकवाड, राघवेंद्र कडकोळ, अशोक उजळंबकर, भाई खोत, विश्वनाथ भारती, सतेज पोटे, सूर्यकांत लवंदे हे यंदाचा चित्रकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
विजू खोटे, उत्तरा केळकर ‘चित्रकर्मी पुरस्कारा’चे मानकरी
मराठी चित्रपट व्यवसायाच्या अभिवृध्दीसाठी जे मराठी चित्रपट व्यावसायिक आपआपल्यापरिने आयुष्यभर कार्यरत राहिले

First published on: 07-07-2014 at 12:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitrakarmi award