अबब! गणेश आचार्यने फस्त केल्या २०० इडल्या

मित्राने दिले होते आव्हान..

ganesh acharya
गणेश आचार्य

बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या तालावर नाचवणारा कोरिओग्राफर गणेश आचार्यने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्या लहानपणीचा एक मजेशीर किस्सा त्याच्या बहिणीने प्रेक्षकांना सांगितला.

‘गणेशला लहानपणापासूनच खाण्याची प्रचंड आवड होती. एकदा त्याच्या एका मित्राने त्याला जास्तीत जास्त इडल्या खाण्याचे आव्हान दिले होते. गणेशने हे आव्हान हसत हसत स्विकारले आणि एकामागोमाग एक अशा २०० इडल्या त्याने फस्त केल्या. गणेशने खाल्लेल्या इडल्यांचा आकडा पाहून त्याचा मित्रसुद्धा अचंबित झाला. कारण तो फक्त १२ इडल्याच खाऊ शकला होता. अशाप्रकारे अगदी सहजतेने गणेशने ती स्पर्धा जिंकली. त्याच्यासाठी ते काही फार मोठे आव्हान नव्हते. उलट तो त्याचा दिवसभराचा नाश्ता होता,’ असे त्याच्या बहिणीने सांगितले. हा किस्सा ऐकून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.

वाचा : ‘बिग बॉस ११’तून सलमानने कमावले *** कोटी रुपये

२०१५ मध्ये गणेशचे वजन २०० किलोंवर गेले होते. पण वर्षभराच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने ८५ किलो वजन घटवले आहे. ‘माझे खाण्याचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. ८५ किलो वजन घटवणे ही काही सोपी गोष्ट नाही. अनेकदा तर मला काहीच न खाता राहावे लागत होते,’ असे त्याने या कार्यक्रमात सांगितले. ‘सुपर डान्सर २’च्या मंचावर गणेशने शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूरसोबत डान्ससुद्धा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Choreographer ganesh acharya revealed that he ate 200 idlis at a time in his breakfast

ताज्या बातम्या