‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’ फेम हॉलिवूड स्टार क्रिस प्रॅटचा एक धमाल डान्स सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत क्रिस बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत ‘टन टना टन टनटन तारा’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. क्रिस आणि वरुणच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून तुफान पसंती मिळताना दिसते.
क्रिस प्रॅटचा ‘द टुमारो वॉर’ हा सिनेमा २ जुलैला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण धवनने क्रिससोबत गप्पा मारत त्याला काही प्रश्न विचारले आहेत. गुरुवारी वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडीओ शेअर केलाय. यात वरुण क्रिसला म्हणतो, “मी तुला बॉलिवूड गाण्यावर काही डान्स स्टेप्स दाखवेल तुलाही त्या फॉलो करत डान्स करायचा आहे. या गाण्याचं नाव ‘टन टना टन’ आहे.” असं म्हणत वरुणने क्रिसला त्याच्या गाण्याच्या डान्स स्टेप दाखवल्या. वरुणचा डान्स पाहून क्रिसदेखील या गाण्यावर डान्स स्पेट करत डान्स एन्जॉय करताना दिसतोय.
View this post on Instagram
क्रिसचा हा डान्स पाहून वरुणने त्याचं कौतुक केलंय. “तुला अगदी बरोबर जमलंय.” असं वरुण म्हणाला. एवढचं नाही तर वरुणने क्रिसचा व्हर्च्युअल बर्थ डे साजरा केला. यासाठी क्रिसने वरुणचे आभार मानले.
तर या मुलाखतीत वरुणने क्रिसला त्याचे सासरे तसचं अमेरिकेचे गव्हर्नर आणि लोकप्रिय हॉलिवूड स्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्यासोबत काम करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर क्रिस म्हणाला, “अरनॉल्ड खूप मोठे स्टार आहेत. त्यांची अॅक्शन पाहूनच बालपण गेलंय. यापुढे जगाला वाचवण्यावर आधारित कोणताही सिनेमा बनवताना आमच्या टीममध्ये मी त्यांना नक्की सामील करेन” असं क्रिस म्हणाला. तसचं भारतात येण्याची संधी मिळाल्यास मला भारतात यायला नक्की आवडेल असंही क्रिस वरुणला म्हणाला आहे.
द टुमारो वॉर’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला असून भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये पाहता येणार आहे. एलियन्सविरुद्ध भविष्यात होणारं युद्ध असं या सिनेमाचं कथानक आहे.