‘चूप’, ‘सीता रामम’ यांसारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेला दाक्षिणात्य अभिनेता दुलकिर सलमान. ‘बंगलोर डेज’, ‘चार्ली’ हे त्याचे मल्याळम चित्रपट चांगलेच गाजले. मल्याळी सुपरस्टार मामूट्टी यांचा तो मुलगा आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘चूप’ चित्रपटातही या अभिनेत्याने दमदार अभिनय केला आहे. सलमानचे चाहते आता फक्त दक्षिणेत राहिले नसून पूर्ण देशभर त्याचे चाहते झाले. दुलकिरचे दिवसेंदिवस चाहते वाढताना दिसत आहेत. मात्र दुलकिर हा बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा चाहता आहे.

मॅशेबलला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला की, मला आठवतंय की, ‘मी सलमान खानच्या गाडीचा पाठलाग केला होता. कारण मी तेव्हा त्याचा खूप मोठा चाहता होतो. त्याची एक झलक बघण्यासाठी मी हे केलं होत. आम्हाला आशा होती की तो गाडीतून खाली उतरेल जेणेकरून आम्ही त्याला पाहू शकू. तो समोरच्या सीटवर बसलेला मला दिसत होता’. तो पुढे म्हणाला मी आजतागायत सलमान सरांना भेटलो नाहीये. मी शाहरुख सरांना दोनदा तीनदा भेटलो आहे. मी आमिर सरांना दोनदा भेटलो आहे मात्र सलमान सरांना भेटायला संधी मिळाली नाही’.

ब्रह्मास्त्रनंतर आता विक्रम वेधा चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची चर्चा!! पहिल्याच दिवशी विकली गेली ‘इतकी’ तिकिटे

२०२१ साली ‘सेकंड शो’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कारही मिळाला होता. यानंतर ‘उस्ताद हॉटेल’ ‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकनही मिळाले.मल्याळम चित्रपटांशिवाय सलमान तमिळ चित्रपटांमध्येही दिसला आहे. मल्याळी चित्रपटांप्रमाणेच त्याला तमिळ सिनेमातही भरपूर यश मिळाले. मुंबईतील बॅरी जॉन स्टुडिओमध्ये तीन महिने अभिनयाचे वर्गही घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुलकिरचा ‘सीता रामम’ हा दाक्षिणात्य चित्रपट उत्तमरित्या चालला. ‘सीता रामम’ हा तेलगू काळातील रोमँटिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चूपला चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.