छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता हृषीकेश पांडेचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाचा परिणाम हा आपल्या मुलांवर होत असतो. विशेष:त मुलं लहान असतील तर त्यांच्यावर याचा अधिक परिणाम होतो. यासाठीच हृषीकेशने गेली अनेक वर्षे यावर कधीही वक्तव्य केलं नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर वक्तव्य केलं आहे.
हृषीकेशने नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने घटस्फोटा विषयी सांगितले आहे. हृषीकेशने ‘सीआयडी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘जग जननी मां वैष्णोदेवी’ अशा अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. २००४ मध्ये त्यानं त्रिशा दुभाष हिच्याशी विवाह केला होता, पण काही वर्षातच त्यांच्यात वाद सुरु झाले. २०१४ मध्ये दोघे वेगवेगळे राहू लागले आणि त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. काही कारणांमुळे ही प्रकिया लांबली आणि तब्बल सात वर्षांनी म्हणजेच यंदाच्या वर्षी १७ वर्षांचं त्यांच वैवाहिक आयुष्य आता कायदेशीर पणे घटस्फोट झाला.
View this post on Instagram
हृषीकेश आणि त्रिशा यांना दक्ष नावाचा एक मुलगा आहे. दक्ष हा आता १२ वर्षांचा आहे. या दोघांनी स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा तो पाच वर्षांचा होता. घटस्फोटाच्या बातम्या आणि होणाऱ्या चर्चांमुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ नये. सोबतच खासगी आयुष्याची चर्चा होऊ नये म्हणून इतकी वर्ष यावर चर्चा केली नाही. मात्र, आता दक्ष मोठा झाला असून आता त्याला गोष्टी कळतात. तर, आता कायदेशीरपपणे घटस्फोट झाल्याने समोर येऊन बोलत असल्याचे हृषीकेशने सांगितले. तर दक्षची कस्टडी ही हृषीकेशला मिळाली आहे.
View this post on Instagram
त्रिशा आणि हृषीकेशने या सगळ्या गोष्टी शांतते हाताळल्या. हृषीकेशनं त्याच्या मुलाल आईला भेटण्यापासून कधीही थांबवले नाही. हृषीकेशचे त्याच्या सासु-सासऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. हृषीकेश आणि त्रिशाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. त्याबद्दल हृषीकेशने त्यांचे आभार मानले आहे.
आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?
‘वेगळं राहण्याच्या काळात सगळं चांगलं असल्याचं दाखवत जगत राहणं खूप कठीण होतं. मी दिवस-दिवस शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दक्षला हॉस्टेलवर ठेवलं होतं. त्यावेळी त्याच्या शाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी काम संपवून रात्रभर ड्रायव्हिंग करून मी त्याच्या शाळेत जात होतो, पण आता दक्ष थोडा मोठा झाल्यानं माझ्या कामाचं स्वरूप त्याला समजू शकतं. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत, असंही हृषीकेशनं सांगितलं.
नव्या नात्यासाठी त्याचे मतं सांगत हृषीकेश म्हणाला, घटस्फोट होऊनही माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. आता लगेच मी कोणत्याही नव्या नात्यासाठी तयार नाही, पण आहे त्या आयुष्यात खुश आहे.