कलाकार आणि चित्रपट रसिकांमध्ये असणारं निखळ मनोरंजनाचं नातं याविषयी सांगावं आणि ऐकावं ते नवलंच. काही रसिकांसाठी चित्रपट, कलाकार आणि ही झगमगती दुनिया इतकी जवळची असते की, कोणत्याही चित्रपटाचं नाव घ्या…, कलाकाविषयीची माहिती विचारा.. उत्तर देण्यासाठी या अशा रसिकांचा हात नेहमीच वर असतो. या अशा मंडळींसाठी आहे आजचा सिने‘नॉलेज’चा प्रश्न..

ऐश्वर्याला ‘मिस वर्ल्ड’चा किताब कोणत्या साली मिळाला होता?
पर्याय-
१. १९९३
२. १९९४
३. १९९५
४. १९९६

मिस इंडिया, मिस वर्ल्ड ते पद्मश्री किंवा कर्नाटक ते मुंबई किंवा तमिळ चित्रपट ते हॉलिवूड असा अॅशचा आजवरचा प्रवास आहे. तिच्या या संपूर्ण कारकिर्दीत सतत समोर दिसतो तो तिचा कामातील प्रामाणिकपणा, उत्साह, जिद्द आणि निरागसता. ‘आखोंकी गुस्ताकिया माफ हो’ गाण्यातून सौंदर्याचीही व्याख्या बदलायला लावणारी ऐश्वर्या Aishwarya Rai म्हणजे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचं अनोखं समीकरण.

वाचा: Maherachi sadi 2 : लवकरच येणार ‘माहेरची साडी २’!

कलाविश्वात सुरुवातीच्या काळात अॅशच्या वाट्याला आलेल्या चित्रपटांमुळे तिला यश मिळालं नव्हतं. पण, त्यानंतरच्या काळात तिचीच जादू चित्रपट जगतामध्ये पाहायला मिळाली. अभिनयासोबतच ती नृत्यकलेतही पारंगत आहे. अॅशने शास्त्रीय नृत्याचे रितसर प्रशिक्षणही घेतलं आहे. कोणताही हेतू नसताना हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिची उपस्थितीसुद्धा लक्षवेधी ठरली होती. सौंदर्याची अद्भुत देणगी लाभलेल्या या अभिनेत्रीला विश्वसुंदरीचा बहुमान केव्हा मिळाला होता हे एव्हाना तुमच्याही लक्षात आलंच असेल. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरुर कळवा; आणि मनोरंजन विश्व तसंच देशविदेशातील काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला.