Dahi Handi 2022 Celebration in Mumbai : दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा मोठा उत्साह या उत्सवाच्या आयोजनात दिसत आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींही दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत.

आणखी वाचा – “सुप्रसिद्ध कलाकार माझ्याबरोबर…” सनी लिओनीचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, काम मिळत नसल्याची खंत

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेली ठाणे टेंभीनाका येथील दहीहंडी सर्वाधिक चर्चेत असते. यावर्षी देखील या दहीहंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरही (Shraddha Kapoor) तिथे उपस्थित होती. इतकंच नव्हे तर तिने मराठीमध्ये उपस्थितांशी संवाद साधत सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

श्रद्धाने गोविंदा पथकांशी संवाद साधत त्यांना मराठीमध्ये दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा असं म्हटलं. श्रद्धाचं मराठी ऐकून यावेळी सगळेच भारावून गेले. शिवाय यावेळी श्रद्धा म्हणाली, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर आहेत यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे. बरंच ऐकलं आहे दिघे साहेबांची हंडी खूप मोठी असते. आज मी ते पाहिलं. ही दहीहंडी खरंच खूप मोठी आहे. तुम्ही मला एवढं प्रेम देता त्यासाठी मनापासून तुमची आभारी आहे. दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र.”

आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?

श्रद्धाचं मराठी ऐकून उपस्थित गोविंदा पथकांनी टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं. तसेच श्रद्धा हा संपूर्ण उत्साह आणि दहीहंडी उत्सव एण्जॉय करताना यावेळी दिसली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.