‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ यासारख्या अनेक मालिकांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या २० वर्षापूर्वी त्या तिसऱ्या स्टेजचा कॅन्सरने पिडीत होत्या. लोकप्रिय शो ‘डान्स दिवाने ३’ चा नुकताच एक प्रोमो रिलीज झालाय. यात या प्रोमोमध्ये अभिनेत्री शगुफ्ता अली त्यांची संघर्षमय कहाणी सांगत असताना या शोच्या सेटवर अगदी भावूक वातावरण निर्माण झालेलं पहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलर्स टीव्हीने या शोचा नवा प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. ‘डान्स दिवाने ३’ च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये शगुफ्ता अली यांनी हजेरी लावल्याचं दिसतं आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री शगुफ्ता अली ‘डान्स दिवाने ३’ च्या सेटवर आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना दिसून येत आहेत. त्यानंतर माधूरी त्यांना ५ लाख रुपायाचा चेक देते. हा प्रोमो शेअर केल्यानंतर ‘डान्स दिवाने ३’ आणि कलर्स टीव्हीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : #BoycottToofaan : प्रदर्शनापूर्वीच ‘तूफान’ वादात; जाणून घ्या काय आहे कारण?

आणखी वाचा : बबीताच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे टप्पू झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले…

एक नेटकरी म्हणाला, ‘चेक दिल्याने काय होईल…काम द्या यांना..इतक्या मालिका सुरु आहेत..काम द्या यांना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ ‘तुम्हाला लाज नाही वाटली का? दिखावा का करायचा, हा चेक त्यांच्या घरी देता आला असता, दान करायचं आहे तर ते जाहिर केला पाहिजे?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘५ लाखाची चिल्लर दिले त्यात त्यांना स्टेजवर बोलवून प्रसिद्धी पण करून घेतली…किती वाईट गोष्ट आहे कलर्स.’

‘डान्स दीवाने’चा प्रोमा पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कलर्स टीव्हीला ट्रोल केलं आहे.

कार आणि दागिने विकून कसेबसे दिवस काढले

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी आर्थिक अडचणीत सापडल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांच्यासाठी तर खरा लॉकडाऊन हा २०१८ पासूनच लागला असल्याचं देखील त्या म्हणाल्या. गेल्या चार वर्षापासून त्या कामाच्या शोधात आहेत. अनेक ठिकाणी ऑडिशन्ससाठी देखील गेल्या होत्या. परंतु कुठेही काम मिळालं नसल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. शेवटी काम मिळवण्याच्या धावपळीत त्यांना मधुमेहानं ग्रासलं आणि आज त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. यापूर्वी त्यांनी उपचारासाठी कार आणि दागिने विकून कसेबसे दिवस काढले. पण आता विकण्यासाठी घरात कोणत्याच वस्तू शिल्लक नसल्यानं त्या हतबल झाल्या आहेत.

आणखी वाचा : राजस्थानहून भेटवस्तू घेऊन आला चाहता, पण जान्हवीची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘मेहंदी’, ‘हीरो नंबर १’ आणि ‘अजुबा’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors tv got trolled for giving 5 lakh rupees to shagufta ali on dance deewane stage dcp
First published on: 10-07-2021 at 16:45 IST