Daisy Shah On Her Viral Video : बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह बऱ्याच काळापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, तिची कारकीर्द काही खास राहिलेली नाही. डान्सर म्हणून करिअर सुरू करणाऱ्या डेझी शाहने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.
अभिनेत्रीने तिच्या व कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या इंटिमेट व्हिडीओबद्दल सांगितले आहे. डेझी शाह व गणेश आचार्य यांचा इंटिमेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर व्हायरल झाला आणि लोकांनी त्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या. डेझी शाहने या व्हिडीओबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.
डेझी शाहने व्हिडीओवर दिली ही प्रतिक्रिया
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान डेझी शाहने स्वतःशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा केली आहे. तिने तिच्या आणि गणेश आचार्यच्या इंटिमेट व्हिडीओवरही प्रतिक्रिया दिली. डेझी शाह म्हणाली, ‘मास्टरजी आणि मी एका गाण्याची रिहर्सल करीत होतो. कोणीतरी ते यूट्यूबवर अपलोड केले आणि म्हटले की ते लव्ह मेकिंग आहे. मला माहीत नाही की, असे का केले. मास्टरजी खूप मस्ती करायचे. म्हणजे ते येता-जाता कोणावरही कमेंट्स करायचे. बऱ्याच वेळा एखाद्या मुलीला ते आवडायचे नाही.’ अशा प्रकारे, डेझी शाहने स्पष्ट केले आहे की, तिचा आणि गणेश आचार्य यांचा व्हिडीओ एका गाण्याच्या रिहर्सलचा आहे.
डेझी शाह बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये काम करीत आहे. डेझीच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात कोणी खास आहे की नाही हे जाणून घ्यायचे असते. डेझी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलत असते.
जर आपण ४० वर्षीय डेझी शाहच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर तिने ‘तेरे नाम’, ‘मस्ती’, ‘हमको दीवाना कर गये’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम केले आहे. डेझी शाहने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर ती ‘हेट स्टोरी ३’ व ‘रेस ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण, अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त डेझी शाहने इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे.