बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा ‘दंगल’ हा सिनेमा २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. सिनेमाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या भलतीच खूश आहेत. आमिरने त्याच्या या सिनेमासाठी फार मेहनत घेतली आहे याबद्दल दुमत असूच शकत नाही. त्यामुळे सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे तोही खूश आहे. पण आमिरच्या ज्या चाहत्यांनी त्याचा सिनेमा आधीच बघितला त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आमिरला छोट्या पडद्यावर गप्पा मारताना आणि अनेक रहस्य उलघडताना दिसत आहे. बॉलिवूडच्या या मिस्टर परफेक्शनिस्टची मुलाखत रणवीर सिंग घेणार आहे. इंडिया टुडेच्या फेसबुक अकाऊंटवर पाहता येईल. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग आमिरची मुलाखत घेताना दिसत आहे.

सदैव आनंदी आणि उत्साही कलाकार अशी ओळख असणाऱ्या रणवीर सिंगने मुलाखतीच्या सुरुवातीलाच आमिरचे ऐवढे कौतुक केले की, आमिर त्याच्या कौतुकानेच लाजला. त्यामुळे तो जेवढे कौतुक करत होतो तेव्हा आमिर त्याला थांबण्यासाठी सांगत होता. रणवीरने या व्हिडिओमध्ये सांगितले की, तो आमिरचा सगळ्यात मोठा चाहता आहे. रणवीर आमिरला घेऊन जेव्हा व्यासपीठावर येतो तेव्हा तो सांगतो की, या अभिनेत्याच्या स्वागतासाठी संपूर्ण संगीताचाच कार्यक्रम ठेवला पाहिजे. या दोघांनी एकत्र गप्पा मारताना बघत या दोघांचेही चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही.

व्हिडिओमध्ये रणवीर त्याच्या आगामी सिनेमा ‘पद्मावती’च्या लुकमध्ये दिसत आहे. तर आमिरनेही कानात बिगबाळी घातली आहे आणि लांब मिश्याही ठेवल्या आहेत. आमिरचा हा लुक त्याच्या आगामी सिनेमासाठी बनवण्यात आला आहे.

दिग्दर्शक म्हणून नितेश तिवारी यांच्या नावावर ‘चिल्लर पार्टी’ या पहिल्याच सिनेमासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यानंतर ‘भूतनाथ”चं यश. ‘दंगल’ हा त्यामुळे एक चांगला विषय, चांगला दिग्दर्शक, कामात चोख असलेला आमिरसारखा अभिनेता आणि तितकेच मेहनती कलाकार यांची अप्रतिम जमून आलेली भट्टी आहे. कुस्तीच्या आखाड्यातील ही दंगल सरत्या वर्षांत तिकीटबारीवरही दंगल करणार यात शंका नाही.