छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. पण नुकतंच या मालिकेद्वारे दयाबेन परतणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत दयाबेन या पात्राची एंट्री होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र नुकतंच प्रसारित करण्यात आलेल्या भागात दयाबेनचा भाऊ सुंदर हा त्याच्या मित्रांसोबत गोकुलधाम सोसायटीमध्ये परतताना दिसत आहे. यामुळे जेठालाल हा नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर सुंदर हा जेठालालची नाराजी दूर करण्यासाठी त्याची विनवणी करताना दिसत आहे. त्यावर जेठालाल म्हणतो की जर ती दोन महिन्यात गोकुलधाम सोसायटीमध्ये आली नाही तर मी उपोषण करेन, असे सुंदरला सांगताना दिसत आहे.

“बाळाच्या जाण्यामुळे आम्ही कोलमडलोय…”; प्रसिद्ध गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर

सध्या या मालिकेचा हा संपूर्ण प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रोमोनंतर अनेकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट करत आमच्या भावनांसी खेळू नका, अशीही कमेंट केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत बोलताना आसित कुमार मोदी म्हणाले, “आता ती एक कथा आहे. आम्ही सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. मी मान्य करतो की अनेक लोक या कार्यक्रमाशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत. त्यामुळे हा ट्विस्ट पाहून अनेकजण अक्षरश: मला शिव्या देत आहेत. मी त्यांच्या कमेंटचा, भावनांचा आणि मताचा आदर करतो.”

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून भारत गणेशपुरे, सागर कारंडे घेणार ब्रेक, कारण आहे फारच खास

“दया भाभी नक्की परत येणार. पण दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकानी परत यावी अशी आमची इच्छा आहे. पण त्यासोबतच आम्ही त्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशनही घेत आहोत. जर दिशा परत आली तर खूप चांगले होईल. कारण ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. पण तिचं पुनरागमन शक्य नसल्यामुळे आम्ही तिच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीची ऑडिशन घेत आहोत”, असेही आसित कुमार मोदी यांनी सांगितले.

“एक निर्माता म्हणून दयाबेन परत यावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात दया भाभी नक्की कार्यक्रमात दिसेल आणि त्यासोबत खूप गोष्टी बदललेल्या असतील. पण दयाबेन ही एका रात्रीत परतू शकत नाही. तिच्यासाठी आम्ही एक जबरदस्त एंट्री ठेवणार आहोत”, असेही त्यांनी सांगितले.