छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे देबिना बॅनर्जी. रामायन या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. आज १८ एप्रिल देबिना तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, वाढदिवस असूनही देबिना खूश नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
देशभरात करोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे देबिनाला तिचा वाढदिवस गेल्या वर्षी प्रमाणेच घरात साजरा करावा लागतं आहे. “या लॉकडाउनमुळे माझा वाढदिवस घरातच साजरा होणार आहे. खरतरं सरकारचा हा निर्यण योग्य आहे. कारण करोना संसर्गाचा प्रसार वाढतोय. वाढदिवस देखील वर्षातून एकदाच येतो, पण गेल्यावर्षी प्रमाणे या वेळी देखील मला माझा वाढदिवस कुटुंबीयांशिवाय साजरा करावा लागणार आहे”, अशा शब्दात देबिनाने तिची खंत व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
पुढे देबिना म्हणाली, “लॉकडाउन संपल्यावर मी लगेच माझ्या कुटुंबीयांना भेटणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत मी पुन्हा एकदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे.”
करोनाचा वाढचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागु केले आहेत. हे निर्बंध ३० एप्रिल पर्यंत असणार आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेच्या लोकांना प्रवास करता येणार आहे. गरज नसताना बाहेर कोणी दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.