बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण भलेही तिच्या कामात व्यस्त राहत असेल. पण, त्याचसोबत ती आपल्या घरच्या गोष्टींकडेही तितकेच लक्ष देते. स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार दीपिका तिच्या जुन्या घरासाठी भाडोत्री शोधत असल्याचे कळते.
सध्या दीपिका तिचा जुना फ्लॅट भाडेतत्त्वार देण्याच्या विचारात आहे. अभिनेता रणबीर कपूरसह प्रेमबंधनात असताना दीपिकाने पाली हिल येथे हा फ्लॅट घेतला होता. खरंतर हा फ्लॅट त्यावेळी रणबीरनेच दीपिकाला घेऊन दिल्याचीही चर्चा होती. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर चार वर्षापूर्वी तिने हे घर रिकामी केले आणि आता ती प्रभादेवी येथे ४ बीएचकेच्या घरामध्ये राहते. मात्र, जुने घर सोडल्यावरही दीपिकाला ते विकण्याची इच्छा नसल्याने तिने ते भाडेतत्वावर दिले होते. काही दिवसांपूर्वी तेथे राहत असलेल्या भाडेकरूंचा करार संपल्याने दीपिका आता नव्या भाडेकरूंच्या शोधात आहे. या संदर्भात दीपिकाने काही उच्च मालमत्ता सल्लागारांशी संपर्क साधल्याचेही कळते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2016 रोजी प्रकाशित
दीपिका घरासाठी शोधतेय भाडेकरू!
दीपिका तिचा जुना फ्लॅट भाडेतत्वार देण्याच्या विचारात आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 01-03-2016 at 13:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika looking out tenants for her pali hill apartments