दीपिका पदुकोण सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आलेली दिसतेय. दीपिकाने एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले होते आणि त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअरही केलेले. मात्र बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चा हा बोल्ड अंदाज काही लोकांना रुचला नसल्याने तिच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र या टीकांना दीपिकाने सडेतोड उत्तर दिले आहे. नेटीझन्सनी केलेल्या टीकांना न जुमानता दीपिकाने आणखी बोल्ड अंदाजातील एक नवीन फोटो शेअर केला आहे.

‘दीपिका तुझ्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही. भारतीय संस्कृतीबाबत थोडातरी सन्मान बाळगा. हॉलिवूडला जाऊन तू एक भारतीय आहेस हे विसरू नकोस,’ अशादेखील कमेंट्स दीपिकाच्या फोटोवर नेटीझन्सकडून करण्यात आल्या आहेत. आपले अभिनय कौशल्य आणि अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर दीपिकाने ‘ट्रीपल एक्स झेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र स्वदेशातच दीपिकाला टीकांना सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींना अनेकदा कपड्यांवरून टीकांना समोरे जावे लागते. याआधी प्रियांका आणि आता दीपिकानेही टीकाकारांना सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले आहे.

वाचा : हृतिकच्या मुलाने असं काय म्हटलं ज्याने तो स्वत:च धास्तावला?

मॅक्सिम पत्रिकेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात दीपिकाने टॉप १०० मध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे. एमा स्टोन, डकोटा जॉनसन, केंडल जेनर, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा ही या यादीत समाविष्ट असलेल्यांपैकी काही नावे आहेत. त्याचप्रमाणे दीपिका लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचा : हा ४० वर्षीय प्रसिद्ध अभिनेता करणार त्याच्यापेक्षा २० वर्षाने लहान अभिनेत्रीशी लग्न?