बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या XXX: Return of Xander Cage या हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलिवूटमध्ये पदार्पण करत आहे. टोरान्टोमध्ये सुरू असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणस्थळी लवकरच दीपिकाला भेटायला खास पाहुणे येणार आहेत. बऱ्याच काळापासून दीपिका घरापासून दूर असल्याने तिच्या पालकांनी टोरान्टोला जाऊन तिला भेटण्याचे ठरविले आहे. आई-वडील भेटण्यासाठी येत असल्याचे कळल्यावर दीपिकाला अत्यानंद झाला आहे. त्यांच्याबरोबर वेळ घलविण्यासाठी ती उत्सुक आहे. घरापासून दूर असताना आपल्या जवळच्या माणसांबरोबर काही काळ घालवायला मिळणे हे खूप सुखकारक असल्याची भावना तिने व्यक्त केली. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दीपिकाचा अभिनय असलेला XXX: Return of Xander Cage चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2016 रोजी प्रकाशित
xXx च्या सेटवर दीपिकाच्या भेटीला खास पाहुणे
xXx चे शूटिंग टोरान्टोमध्य़े सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-04-2016 at 14:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone has very special guests on the sets of xxx return of xander cage