अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दीपिकाची बोल्ड दृश्यं ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने निवडलेले बोल्ड आउटफिट्स या सगळ्याचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला तिनं लग्नानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिलेल्या बोल्ड सीनवरून प्रश्न विचारण्यात आले.
दीपिका पदुकोण ‘गहराइयां’ चित्रपटात बोल्ड अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तिने सिद्धांतसोबत किसिंग सीनही दिले आहेत. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला ‘चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत बोल्ड दृश्यं देण्यासाठी रणवीरची परवानगी घेतली होतीस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं दीपिकानं उत्तर दिलं.
‘बॉलिवूड बबल’शी बोलताना दीपिका म्हणाली, ‘जर यावर मी प्रतिक्रिया दिली तर तो मुर्खपणा ठरेल. मी कधीच कमेंट्स वाचत नाही आणि मला वाटतं रणवीरही अशा कमेंट वाचत नसावा. माझ्या मते असं करणं मुर्खपणा लक्षण आहे. रणवीरबद्दल सांगू तर त्याला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. माझ्या चित्रपटाचाही त्याला अभिमान वाटेल. या चित्रपटातील माझा अभिनय देखील त्याला आवडला आहे.’
दरम्यान दीपिकानं एका मुलखातीत ‘गहराइयां’ सारखा बोल्ड चित्रपट निवडण्याचं श्रेय पती रणवीर सिंहला दिलं होतं. त्यामुळेच मी एवढी बोल्ड झाले असं ती म्हणाली होती. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, धैर्य कारव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटात आधुनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.