जादू की भूत? दीपिका पादुकोणने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

नुकतंच दीपिकाने तिच्या फॅन्सना घाबरवून टाकणारा एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय. काही फॅन्सना तर तो व्हिडीओच समजुन आला नाही.

deepika-padukone-shares-a-spooky-video
(Photo: Instagram/deepikapadukone)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या फॅन्सना घाबरवून टाकणारा एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय. तिने तिच्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला पाहून तिचे अनेक फॅन्स घाबरून गेले आहेत, तर काही फॅन्सना तर तो व्हिडीओच समजुन आला नाही. या व्हिडीओमुळेच सध्या तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय.

दीपिका पादुकोणचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हिडीओ

‘मस्तानी गर्ल’ दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा विचित्र व्हिडीओ शेअर केलाय. तिचा हा व्हिडीओ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फॉरमॅटमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका एका फ्रेममध्ये विचित्र पोज देताना दिसून येतेय. पण नंतर अचानक कॅमेरा तिच्या फ्रेमवर झूम होतो आणि दीपिका तिच्या फोटोमधून जिवंत होते. त्यानंतर दीपिका जोर जोराने श्वास घेते. तितक्यात आणखी एका दुसऱ्या दीपिकाची एन्ट्री होते आणि फ्रेममधून जिवंत झालेल्या दीपिकाला फुगा फोडल्यासारखं नष्ट करते. त्यानंतर दुसरी दीपिका स्वतः खुर्चीवर बसून पोज देते. हा व्हिडीओ नक्की काय आहे, तुम्हाला ही समजला नसेल तर एकदा हा व्हिडीओ पहाच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

भूत असलेलं इमॉटिकॉन

या व्हिडीओला शेअर करताना दीपिकाने कोणती कॅप्शन सुद्धा लिहिली नाही. दीपिकाने यासोबत कॅप्शन दिली असती तर तिच्या फॅन्स तिच्या या व्हिडीओबाबत थोडी फार कल्पना तरी आली असती. पण दीपिकाने कॅप्शन न देता केवळ एक भूताचं इमॉटिकॉन शेअर केलंय.

deepika-post-comments
(Photo: Instagram/deepikapadukone)

दीपिकाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तिचे फॅन्स मात्र घोळात पडले आहेत. काही फॅन्सना तर हा नक्की कशासाठीचा आहे, या व्हिडीओमध्ये तिला काय सांगायचं होतं, या व्हिडीओमध्ये नक्की काय होतं, असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत फॅन्स त्यांचे प्रश्न विचारताना दिसून आले आहेत. काही फॅन्सनी तर व्हिडीओ समजुन आला नाही तरी व्हिडीओ एन्जॉय करताना दिसून येत आहेत. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone shares a spooky video aad

ताज्या बातम्या