दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ‘वझीर’ चित्रपट पाहण्यासाठी मुंबईतील एका चित्रपटगृहात हजेरी लावली होती. यावेळी फरहान खान आणि अदिती राव हैदरी यांच्यासह वझीरचे निर्माते विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक बिजॉय नांबियारदेखील उपस्थित होते. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाची टीम आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘वझीर’चा विशेष खेळ आयोजित केला होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर ‘आप’चे नेते मनिष सिसोदिया आणि कुमार विश्वास यांनीदेखील चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार यांनी ट्रेलरमधून तरी फरहान आणि बिग बी यांच्या भूमिका आणि वावर याविषयी एक प्रकारची गूढता जोडली आहे असे वाटतेय. ८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच हे गूढ उकलणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘वझीर’ पाहण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि सिसोदियांची उपस्थिती
चित्रपटाची टीम आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 'वझीर'चा विशेष खेळ आयोजित केला होता

First published on: 06-01-2016 at 11:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi chief minister arvind kejriwal watches wazir with star cast