उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच चर्चेत असतात. अमृता या सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतात. त्यांची एक गायिका म्हणून देखील स्वतंत्र ओळख आहे. इतकंच नव्हे तर अमृता यांची गाणी सोशल मीडिया आणि युट्यूबवर तुफान व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या गाण्याला मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील येतात. आता पुन्हा एकदा अमृता एका नव्या गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

आणखी वाचा – Photos : वयाच्या ५०व्या वर्षी राहुल खन्नाचं न्यूड फोटोशूट, अभिनेत्याला पाहून मलायका अरोरा म्हणते…

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आज हे गाणं सारेगम या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ असं या गाण्याचं नाव आहे. ‘माय लव्ह’ या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे. अमृता यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ हे जुन्या गाण्याचंच रिक्रिएट वर्जन आहे.

पाहा व्हिडीओ

‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याच्या रिक्रिएट वर्जनचे बोल अमृता फडणवीस यांचे आहेत. तसेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्या स्वतः हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता यांनी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. हे नवं गाणं ऐकता काहींनी त्यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : “अनेकांच्या अनेक शंका होत्या पण…” अमोल कोल्हेंच्या ‘या’ पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाण्याला ५ तासांमध्येच १० लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. ‘माय लव्ह’ या चित्रपटामधील हे गाणं याआधी आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. तर सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी ते गायलं होतं. आता अमृता यांनी पुन्हा या गाण्याच्या आठवणींना आपल्या आवाजाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.