छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘देवों के देव महादेव’मध्ये काम करणारा अभिनेता मोहित रैना शनिवारी लग्न बंधनात अडकला आहे. त्याने गुपचूप गर्लफ्रेंड आदितीशी लग्न केले आहे. मोहितने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना लग्न केल्याची माहिती दिली आहे.

मोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने ‘आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हाला आशिर्वाद द्या’ या आशयचे कॅप्शन दिले होते. त्याच्या फोटोवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा : अर्जुन बिजलानीला ओमायक्रॉनची लागण, आईची करोना चाचणीही पॉझिटिव्ह

फोटोमध्ये मोहितने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर आदितीने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर मृणाल ठाकूर, करण जोहर, दीया मिर्झा आणि इतर काही कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही यूजरने ‘शिव-पार्वती’ असे म्हटले आहे.

मोहित देवों के देव महादेव या मालिकेत भूमिका साकारली. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्याने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. तसेच डायरीज 26\11 मध्ये देखील तो दिसला होता. यापूर्वी मोहित अभिनेत्री मौनी रॉयला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता मोहितने गर्लफ्रेंड आदितीशी लग्न केले आहे.