Dhanashree Verma Talks About Ex Husband Yuzvendra Chahal : धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाबद्दल सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता धनश्रीनं घटस्फोटानंतर प्रेम करण्याबद्दल सांगितलं आहे.
धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या कार्यक्रमात झळकत आहे. घटस्फोटानंतर ती पहिल्यांदाच या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. अशातच आता या कार्यक्रमाच्या नवीन भागात तिनं तिच्या घटस्फोटाबद्दल, तसेच खासगी आयुष्यातील अनुभवांबद्दल सांगितलं आहे.
धनश्री वर्माची प्रतिक्रिया
धनश्री याबद्दल म्हणाली की, तिला कुठल्याही नवीन रिलेशनशिपमध्ये यायचं नसून, सध्या तिला या सगळ्यापासून दूर राहायचं आहे. पुढे ती म्हणाली, “मला आता माझ्या आयुष्यात कोणीही नको आहे. मी माझ्या नात्यात खूप काही सहन केलं आहे.”
धनश्रीने पुढे असं सांगितलं, तिला इतर महिलांसाठी एक उत्तम उदाहरण बनायचं आहे की, घटस्फोटानंतरही तुम्ही आनंदी राहू शकता आणि त्यानंतरही तुमची प्रगती होऊ शकते. तुम्ही पुढे जाऊ शकता.
धनश्रीने यापूर्वीही तिचा पूर्वाश्रमीचा पती युजवेंद्र चहलबद्दल याच कार्यकाळात प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणालेली, “प्रत्येकाला स्वत:चा आणि इतरांचा आदर करता आला पाहिजे. मीसुद्धा माझ्या नवऱ्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलून, त्याचा अपमान करू शकत होते; पण मी त्याचा आदर ठेवला. तम्हाला स्वत:ला चांगला दाखवायचं असेल, तर ते तुमच्या कामातून सिद्ध करा. दुसऱ्या कोणाला खाली पाडून किंवा त्यांच्याबद्दल काही बोलून करू नका.”
धनश्री सध्या अशनीर ग्रोवरच्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधून झळकत आहे. हा कार्यक्रम ओटीटीवर प्रसारित होत आहे. तिच्यासह यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, धनश्री व युजवेंद्र यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधलेली. दोघांचा प्रेमविवाह होता. परंतु, लग्नानंतरच्या काही वर्षांतच त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि मार्च २०२५ मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.