‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याने लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली होती. यावेळी आनंद दिघे यांची बहिणी अरुणाताई यांच्यासोबत झालेल्या भेटी विषयी प्रसादने सांगितले आहे.

प्रसादने लोकसत्ता डिजीटल अड्डामध्ये अरुणाताईंसोबतच्या भावनीक भेटीविषयी सांगितले. “माझी आणि अरुणाताई यांची पहिली भेट ही म्युझिक लॉन्चवेळी झाली. मी एण्ट्री केल्यानंतर त्यांनी मला आनंदा अशी हाक मारली. त्यानंतर मला जवळ घेऊन म्हणाल्या माझा आनंद परत आलाय, तू माझा आनंद आहेस. माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे,” असे प्रसादने सांगितले.

आणखी वाचा : “दिघे साहेब गेले तेव्हा अख्खं ठाणं जळत होतं अन्…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.