“…आणि पावर काय आहे ते समजलं”, ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या सांगितलेला किस्सा खरंच थक्क करणारा आहे.

“…आणि पावर काय आहे ते समजलं”, ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या सांगितलेला किस्सा खरंच थक्क करणारा आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनात घर करुन राहिला. अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर हुबेहुब साकारली. पण त्याचबरोबरीने या चित्रपटामधील आणखी एक अभिनेता चर्चेत राहिला आणि तो म्हणजे क्षितीश दाते. क्षितीशने या चित्रपटामध्ये राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली.

आणखी वाचा – Big Boss 16 : नव्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘हे’ १७ स्पर्धक?, मराठी ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचाही समावेश

ही भूमिका साकारणं क्षितीशसाठी काही सोपं नव्हतं. राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आणि त्यातही त्यांचं काम पाहता क्षितीशला बरंच दडपण आलं होतं. पण चित्रपटासाठी त्याला एकनाथ शिंदे यांची उत्तम साथ मिळाली. श्रेयर्स रेकॉर्डस या युट्यूब चॅनलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये क्षितीशने चित्रपटादरम्यानचे काही किस्से सांगितले. तो एकनाथ शिंदे यांची भूमिका जगला.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत विचारताच क्षितीश म्हणाला, “एकनाथ शिंदे सरांच्या घरी आम्ही एक सीन शूट केला. अर्थात त्यांचं घरामध्ये एक ऑफिस आहे. शिवाय घरी लोकांची वर्दळ असते. माझा सेटवरच मेकअप केला आणि इनोव्हामधून त्यांच्या घरी नेलं. खरंच मी थट्टा करत नाही. पण सेटपासून त्यांच्या घरी जाईपर्यंत ठाण्यामध्ये काही ठिकाणी वाहतूक कोंडी होती. यादरम्यान लोकांनी मला एकनाथ शिंदे यांच्या लूकमध्ये गाडीच्या काचेमधून पाहिलं. माझी प्रतिमा धूसर दिसत होती. लोक मला एकनाथ शिंदे आहेत हे समजून अक्षरशः हात जोडून नमस्कार करत होते. यामधूनच एकनाश शिंदे यांची पावर काय आहे ते समजलं.”

पाहा लोकसत्ताचा डिजीटल अड्डा –

आणखी वाचा – भारतीय सिनेसृष्टीमधील सर्वात महागड्या चित्रपटासाठी सलमान-शाहरुख एकत्र?, वाचा याबद्दल सर्वकाही

तसेच या भूमिकेसाठी त्याने एकनाथ शिंदे यांची अनेक भाषणं ऐकली. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करण्यामागे एकनाथ शिंदें यांचं मोठं योगदान आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद घोषित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाण्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कौतुकही केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dharmaveer movie actor kshitish date who play maharashtra new cm eknath shinde role talk about thane political leader see details kmd

Next Story
Kaali Poster Row : वादग्रस्त पोस्टरमुळे निर्माते अडचणीत, दिल्ली- युपीमध्ये FIR दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी