बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच दिया आई झाली असून सध्या ती सध्या तिचं मातृत्व एन्जॉय करताना दिसते. पण यासोबतच दिया मिर्झाचं तिची सावत्र मुलगी समायरासोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. दियानं समायराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.

समायरा ही दिया मिर्झाचा पती वैभवच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. समायरा आज १३ वर्षांची झाली आहे. या निमित्तानं दियानं तिच्या फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतचं तिनं समायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दियाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा- The Kashmir Files बद्दल प्रश्न विचारल्यानं पत्रकारावर भडकला जॉन अब्राहम, म्हणाला…

दिया मिर्झानं इन्स्टाग्रामवर समायराचा फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘१३ व्या वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या अनमोल मुली. माझ्यासाठी तुझ्या हृदयाचे आणि घराचेही दरवाजे उघडण्यासाठी धन्यवाद हे केवळ तूच करू शकतेस. माझ्यासाठी तू खूप खास आहे. मला तुझ्यासोबत बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’

आणखी वाचा- Video: लग्झरी कार सोडून प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास, तुम्ही ओळखलंत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिया मिर्झाच्या या पोस्टचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान दिया मिर्झानं मागच्या वर्षी बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केलं होतं. वैभव आणि दिया यांनी एक मुलगा देखील आहे. तर समायरा ही वैभव आणि त्याची पहिली पत्नी सुनैना रेखी यांची मुलगी आहे. समायरानं दिया आणि वैभवच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती. समायरा आणि दिया यांच्या खूपच खास बॉन्डिंग असल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं.