अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दिया सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आता देखील अशीच एक भावूक पोस्ट तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. दियाची भाची तान्याचं निधन झालं आहे. याबाबत पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली. तसेच आपलं दुःख व्यक्त केलं. दियाची ही पोस्ट पाहून कलाविश्वातील मंडळींनी यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – “हे खूप अति झालं” रणवीर सिंहनंतर ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजचा न्यूड लूक पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

दियाने आपल्या भाचीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अगदी तरुण असल्याचं दिसून येत आहे. दिया म्हणते, “माझी भाची, माझं बाळ आणि माझं मुल आता या जगातच नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला प्रेम आणि शांती मिळो. तू नेहमीच आम्हाला हसवलंस. तू जिथे असशील तिथे तुझं नाचणं, हसणं आणि गाण्याने आनंद बहरेल. ओम शांती.” असं म्हणत दियाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दियाच्या भाचीचं निधन नक्की कशामुळे झालं याबाबत तिने बोलणं टाळलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, दियाच्या भाचीचं नाव तान्या होतं. कार अपघातामध्ये तिचं निधन झालं. हैद्राबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावरून तान्या आपल्या मित्र-मंडळींबरोबर घरी परतताना हा अपघात घडला. तिला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तान्याने अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – “बालपणापासूनच मी संघ स्वयंसेवक” ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकांनी मोहन भागवतांबाबत शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दियाच्या या पोस्टनंतर अर्जुन रामपाल, गौहर खान, फराह अली खान, रिद्धीमा कपूर यांसारख्या कलाकार मंडळींनी कमेंट केल्या आहेत. या मंडळींनी कमेंट करत दियाच्या भाचीला श्रद्धांजली वाहिली आहे.