गरोदरपणात दिया मिर्झा कशी झाली जखमी? , चाहत्यांच्या प्रश्नावर दियाने दिलं उत्तर

दियाचा जखमी अवस्थेतील फोटो पाहून चाहते चिंतेत

diya-mirza
(photo-instagram@diamirzaofficial)

अभिनेत्री दिया मिर्झा सध्या गरोदर असून हा काळ ती एन्जॉय करतेय. दिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र शुक्रवारी दिया मिर्झाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला.

शुक्रवारी दिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर आणि हातांवर जखमा झाल्याचं दिसतंय. ती खुर्चीत डोळे बंद करून ध्यानस्त बसल्याचं हा फोटोत पाहायला मिळतंय. हा फोटो पाहून दियाच्या अनेक चाहत्यांची चिंता व्यक्त करत तिची विचारपूस केली. या जखमा नेमक्या कशा झाल्या असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला. य़ानंतर दियाने या जखमांमागचं सत्य काय हे चाहत्यांना सांगत त्यांची चिंता दूर केली.

हा फोटो शेअर करत दिया मिर्झा कॅप्शनमध्ये म्हणाली, ” ध्यान करणं हे खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक व्यक्तीला हे समजलं असतं तर. ही जीवन बदलणारी गोष्ट आहे. मी घरी असो किंवा कामात ध्यान करणं हा माझा रोजचा दिनक्रम आहे.” खरं तर दियाने जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने दियाने हा फोटो शेअर केला होता. यावेळी हा फोटो ‘काफिर’ च्या सेटवरील असल्याचं तिने म्हंटलं आहे. त्यामुळे या जखमा खऱ्या नसून खोट्या आहेत. २०१९ मध्ये ‘काफिर’ वेब सीरिज रिलीज झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

दियाने हा फोट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये फोटो सेटवरील असल्याचा उल्लेख केला असला. तरी काही नेटकऱ्यांचं त्या नोटकडे दूर्लक्ष झालं असावं आणि त्यांनी दियाला या दुखापतीबद्दल विचारणा केली. एक युजर म्हणाला, “जखमी कशी झालीस?”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुमच्या चेहऱ्यावर जखमा कशा झाल्या?”.तर काही इतर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करणाऱ्य़ा युजर्सना या जखमा खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

दिया मिर्झाने सोशल मीडियावरून ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. वैभव रेखीसोबत लग्न करण्यापूर्वीच ती गरोदर होती.तर वैभव रेखीसोबत फक्त गरोदर असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय न घेतल्याचं देखील तिने स्पष्ट केलं होतं. आम्हाला दोघांना पुढचं आयुष्य सोबत घालवायचं असल्याने लग्न करत असल्याचं ती म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dia mirza share photo on world meditation day fans are worried as dia share injured photo kpw

ताज्या बातम्या