पुरुषांना पगार आणि स्त्रीला वय कधी विचारू नये असे म्हणतात. तरीही काही आचरट आणि अजागळ माणसं असा आगाऊपणा करतातच. त्यातही अभिनयाच्या क्षेत्रात काम करणार्या स्त्रीला तर वय विचारण्याचा अक्षम्य गुन्हा कुणीही करू नये. अभिनेत्रींना कुणी वय विचारलेच तर त्याचे खरे उत्तर येईलच याचीही शाश्वती नसते. त्यातचं आता बॉलीवूडची क्वीन कंगनाच्या वयाचा खुलासा झाला आहे. कंगनाच्या पासपोर्टनुसार तिची जन्म तारीख ही १३ मार्च १९८६ आहे. म्हणजेच तिचं वय ३१ वर्ष आहे. पण कंगना स्वत:चं वय २९ वर्ष असल्याचं सांगते. अशी माहिती एका संकेतस्थळाने दिली आहे. जर असे असेल तर कंगना तिचे वय का लपवतेय? हा चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या कंगना आणि हृतिक रोशनमध्ये सुरू असलेला वाद सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. त्यातचं आता कंगनाने आपले वय लपवून आणखी एक चर्चेचा विषय लोकांना दिलायं. यापूर्वी कंगनाने ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट आपण केवळ सलमान खानच्या आग्रहाने केला होता, असे म्हटले होते. पण जेव्हा सलमानला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने याबाबत कंगनासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2016 रोजी प्रकाशित
Kangana Ranaut: कंगना का लपवतेय तिचं वय ?
कंगनाच्या पासपोर्टनुसार तिची जन्म तारीख ही १३ मार्च १९८६ आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 23-05-2016 at 13:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did kangana ranaut lie about her age