प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे दिग्दर्शन असलेला शेर शिवराज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकंतच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. दिग्पाल लांजेकर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शेर शिवराज या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी ते गाणेही शेअर केले आहे. ‘यळकोट देवाचा’ असे या गाण्याचे नाव आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर केला आहे.

“जावळीच्या जंगलाचा राजा एकच…”, अंगावर शहारा आणणारं ‘शेर शिवराज’चे नवं पोस्टर पाहिलंत का?

“साक्षात शिव – शंभूचा अवतार, मावळ देशीचा शिवमल्हार…शिवबा आमचा तारणहार.., प्रस्तुत आहे आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकरच्या स्वरात, दिग्पाल लांजेकर लिखित ‘येळकोट देवाचा’ लिरिकल व्हिडीओ”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिला आहे. अवघ्या काही मिनिटापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला तुफान लाइक्स मिळाले आहेत. त्यासोबत त्यांच्या पोस्टवर अनेक कमेंटही पाहायला मिळत आहे.

‘यळकोट देवाचा’ हे गाणे दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेले आहे. तर या गाण्याला आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर या स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात चिन्मय मंडलेकर, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, विक्रम गायकवाड, सचिन देशपांडे यांसारखे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीचा मुंबई लोकलने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाली “अनेक वर्षानंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.