Sher Shivraj Trailer : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो.

शेर शिवराज या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरची सुरुवात अफजलखानच्या एंट्रीने होते. अफजलखानाने केलेले अत्याचार, त्याची ताकद या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली युक्ती आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्वाची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर नि:शब्द व्हायला होते. विशेष म्हणजे हा चित्रपटातील दृश्य पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात.

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता साकारणार नजरेत विखार असणारा अफजलखान; ‘शेर शिवराज’चे नवे पोस्टर प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

“जावळीच्या जंगलाचा राजा एकच…”, अंगावर शहारा आणणारं ‘शेर शिवराज’चे नवं पोस्टर पाहिलंत का?

दरम्यान ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली आहे. ‘येळकोट देवाचा’ आणि शिवबा राजं ही दोन्हीही गाणी सध्या युट्यूबर ट्रेंडीग पाहायला मिळत आहे. ही दोन्हीही गाणी दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेली आहेत.