बॉयकॉट ट्रेंड आणि प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगभरात चित्रपटाने ३०० कोटी इतकी कमाई केली असल्याचं म्हंटलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि इतर गोष्टींवर टीका होत असली तरी यातील एका गोष्टीबद्दल सगळेच लोकं भरभरून बोलत आहेत ती म्हणजे यातली शाहरुख खानची छोटीशी भूमिका.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खानची एक छोटीशी भूमिका आहे ज्याची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. चित्रपटापेक्षा शाहरुखची भूमिकाच काही लोकांना पसंत पडल्याचंही म्हंटलं जात आहे. यामध्ये शाहरुखने एका वैज्ञानिकाची भूमिका साकारली आणि आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच शाहरुखला पाहून त्याचे कित्येक चाहते त्याच्या त्या भूमिकेच्या प्रेमात आहेत.

दिग्दर्शक अयान मुखर्जीनेही याबद्दल शाहरुखचे आभार मानले आहेत. पीटीआयला दिलेल्या वक्तव्यात अयान म्हणतो, “शाहरुख खानचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. काही वेळा शाहरुखसारखी माणसं जेव्हा निर्मळ मनाने केवळ मैत्रीखातर ज्या गोष्टी करतात त्याची परतफेड होऊ शकत नाही. शाहरुखने ब्रह्मास्त्रसाठी जे केलंय त्याची परफेड करता येणं अशक्य आहे. त्यामुळेच लोकांनाही चित्रपटातला शाहरुखचा भाग जास्त आवडला आहे.”

आणखी वाचा : “मला चित्रपट दाखवायलाही त्यांच्याकडे…” शाहरुखने सांगितला त्याच्या वडिलांचा भावूक किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात शाहरुखचं नाव मोहन भार्गव आहे जो एक वैज्ञानिक आहे आणि त्याच्याकडे एक प्राचीन अस्त्र आहे ज्याचं नाव वानरास्त्र दाखवलं आहे. याची सुरक्षा करणं ही त्याची जबाबदारी आहे. शाहरुखचं हे पात्र त्याच्या ‘स्वदेस’ या चित्रपटातील पात्रापासून प्रेरित आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागातही शाहरुखची झलक बघायला मिळू शकते अशी चर्चा आहे. शिवाय शाहरुखच्या पात्रासाठी एक वेगळी कथा अयान मुखर्जी लिहिणार असल्याच्याही चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत.