आता पर्यंत आपण असे अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत. ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्यांना खळखळून हसवलं. असाच एक चित्रपट म्हणजे जत्रा आहे. जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच जत्रा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली. तर कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कुशल बद्रिकेने चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा मजेशीर टीझर शेअर करत कुशल म्हणाला, “ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटलाय… कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, असे कॅप्शन कुशलने दिले आहे.

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जत्रा’ हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं होतं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडेकर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात अजय-अतुलने संगीत दिलं होतं. या चित्रपटातील गाणी आजही सर्वांना थिरकायला भाग पाडतात. या चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गं ये ये मैना’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. यातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचा हिंदी रिमेकसुद्धा बनला आहे, ज्याचं नाव आहे ‘चिकणी चमेली’. तसेच ‘ये गं ये ये मैना’ या गाण्याचासुद्धा हिंदी रिमेक बनला आहे ज्याचं नाव आहे ‘मेरा नाम मेरी है..’. या अप्रतिम यशानंतर आता नववर्षात ‘जत्रा 2’ सर्वांच्या भेटीला येणार आहे.