अभिनेता नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच ‘बालगंधर्व’ यांच्या आयुष्यावर आधारित ‘बालगंधर्व’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने ‘बालगंधर्व’ ही मुख्य भूमिका साकारली होती. सुबोधने बालगंधर्व चित्रपटात स्त्री भूमिका करणाऱ्या महान कलाकाराची भूमिका पार पाडली होती. आज या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक पोस्ट केली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी बालगंधर्व या चित्रपटाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात रवी जाधव हे दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला मार्गदर्शन करताना दिसत आहे. त्याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : ‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण, सुबोध भावेने शेअर केला खास फोटो, म्हणाला “आज…”

रवी जाधव यांची पोस्ट

“आज एक तप झाले “बालगंधर्व” हा माझा पहिला ‘बायोग्राफीकल’ चित्रपट प्रदर्शित होऊन जो आमच्या टिमच्या आणि प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहील!!!

उद्या तब्बल १२ वर्षांनी माझ्या दुसऱ्या ‘बायोग्राफीकल’ चित्रपट ‘मै अटल हूँ’ च्या चित्रीकरणाचा प्रारंभ होत आहे. असाच आशिर्वाद असावा!!!”, असे कॅप्शन रवी जाधवने या फोटोंना दिले आहे.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रवी जाधव हे लवकरच देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. उद्यापासून या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणरा आहे.